Breaking News

वर्णनात्मक नोंदी | इयत्ता 2 री मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

 इयत्ता 2 री मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी


*_मूल्यमापन व मूल्यमापन नोंदी 2022_*
════════════════
*प्रत्येक शैक्षणिक वर्षात आपणास विद्यार्थी मूल्यमापन पूर्ण करावे लागते. यामधील महत्त्वाचा भाग म्हणजे मूल्यमापन नोंदी. या नोंदी कश्या कराव्यात कोणत्या सुधारणा लिहाव्यात. याविषयी आपणास मदत व्हावी यासाठी आपण खालील लिंक वरून ॲप डाऊनलोड करून घेवू शकता.*
ॲपची वैशिष्ट्ये-
1) वापरण्यास अगदी सोपे
2) प्रत्येक वर्गाच्या नोदी
3) विषय निहाय नोंदी
4) आवश्यक सुधारणा नोंदी
5) आवड व छंद या नोंदी
6) सर्व साधारण नोंदी चा समावेश
*● इयत्ता १ली ते ५ वि साठी* 👉🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.theappsstation.android5e6fa2fd4975a

अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-

विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.

१) दैनंदिन निरीक्षण  सर्व विषय

२) तोंडी काम

३) प्रात्यक्षिके

४) उपक्रम / कृती

५) प्रकल्प

६) चाचणी

७) स्वाध्याय

८) इतर 

          अ) प्रश्नावली

          ब) सहाध्यायी मूल्यमापन

          क) गटकार्य

 

संकलित मूल्यमापन तोंडीप्रात्यक्षिक , लेखी-

ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतातविशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जातेजसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे.   द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावेसंकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखीतोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय मराठी

१) दिलेल्या कार्ड वरील शब्दांचे वाचन करतो.

२) वाक्य वाचन करतो. दिलेले वाक्य वाचन करतो.

३) शब्द तयार करतो वाचन करतो.

४) कथा सांगतो गाणी ऐकतो.

५) योग्य आवाजात वाचन करतो.

६) कथा सांगतो चिञ काढतो.

७) समान जोडअक्षराच्या जोड्या लावतो.

८) फलकावरील शब्द ओळखतो.

९) पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवतो.

१०) स्वताची माहिती सांगतो.

११) चिञ वर्ण करतो माहिती सांगतो.

१२) पाहिलेल्या ठिकाणाचे वर्णन करतो.

१३) बडबडगीताचे तालासूरात वाचन करतो.

१४) परीसरातील पाहिलेस्या गोष्टी सांगतो.

१५) प्राणी व पक्ष्याची माहिती सांगतो.

१६) शब्दाचे प्रकट व मौन वाचन करतो.

१७) गटामध्ये प्रकट वाचन करतो.

१८) पाठ्यपुस्तकातील चिञाचे वर्णन करतो.

१९) वाक्य वाचन करतो सराव करतो.

२०) स्वताच्या भावना विचार व्यक्त करतो.

२१) शाळेतील विविध कार्यक्रमात सक्रिय भाग घेतो.

२२) आपल्या दिनक्रमाची माहिती सांगतो.

२३) आपल्या आवडीनुसार वाचन करतो.

२४) आवाजातील साम्यभेद ओळखतो.

२५) दिलेले वर्गकार्य वेळेत करतो.

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

अडथळ्यांच्या नोंदी विषय मराठी

१) सहजपणे भाषण करता येण्यासाठी प्रयत्न करावा.

२) वाचताना अडखळतोस्पष्ट वाचन करावे.

३) शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.

४) बोलत असताना आपल्या बोली भाषेचा वापर करतो.

५) इतरांशी बोलताना प्रमाण भाषा वापरावी.

६) वर्ण सांगतो माञ ते लिहता यावीत.

७) स्वताच्या भावना व्यक्त करता यावे.

८) कविता तालासूरात गायन करावे.

९) दिलेल्या सूचना ऐकतो माञ पालन देखील करावे.

१०) दिलेले वर्ग कार्य करावे.

११) दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

१२) दिलेला भाग वाचन करताना अडखळतो.

१३) सुचवलेला भाग चूकीच्या पध्दतीने सांगतो.

१४) कथा कविता ऐकतो पण उत्तर द्यावी.

१५) बोलताना शब्द वाक्य रचना चूकीची नसावी.

१६) मजकुर ऐकतो , प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी.

१७) प्रश्न तयार करता यावी.

१८) विचारलेल्या प्रश्नाची चूकीची उत्तरे देतो.

१९) शब्द लक्षपूर्वक ऐकावी.

२०) लेखनात चूका करतो. चूका सुधारणा करावी.

२१) स्वताच्या गरजा आपल्या शब्दात मांडता येत नाहीत.

२२) कविता गीत म्हणताना चूका करतो.

२३) दिलेला स्वध्याय वेळेवर पूर्ण करावे.

२४) मजकूर लक्षपूर्वक ऐकावे.

२५) वर्गकार्यात गटकार्यात भाग असावा.

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय गणित

१) विविध खेळ खेळतोखेळात सक्रिय भाग घेतो.

२) दिलेल्या विविध वस्तुचे वर्गिकरण करतो.

३) वस्तू अथवा वजनाची माहिती सांगतो.

४) संख्यांचा लहानमोठेपणा ओळखतो.

५) आठवड्यातील वारांची नावे क्रमाने सांगतो.

६) दिलेली बेरजेची उदाहरणे सोडवतो.

७) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो.

८) वजाबाकीचा संबोध समजून सांगतो.

९) संख्यामालिकेचे वाचन करतो.

१०) तीन संख्या संख्याचे वाचन लेखन करतो.

११) दिलेल्या संख्येचे क्रमांने लेखन वाचन करतो.

१२) ० या संख्येचे वाचन व माहिती सांगतो.

१३) १० ते २० संख्येचे वाचन लेखन करतो.

१४) वजाबाकीवरील दिलेली उदाहरणे अचूकपणे सोडवतो.

१५) गणितातील बडबडगीते तालासुरात म्हणतो.

१६) दिनक्रमांत आधी नंतर येणा-या सांगतो.

१७) संख्यांचा लहानमोठेपणा ओळखतो.

१८) दिलेल्या संख्यांचे संख्याकार्डचे वाचन करतो.

१९) बेरजेचा संबोध अचूकपणे सांगतो.

२०) दिलेल्या संख्यांचे वाचन व लेखन अचीक करतो.

२१) स्वतःच्या आवडीप्रमाणे कोडी तयार करून सोडवतो.

२२) १०० पर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन करतो.

२३) संख्यांचा लहान मोठेपणा ओळखतो.

२४) वर्गकार्यात सक्रीय भाग घेतो.

२५) तीन अंकी संख्या वाचन लेखन करतो.

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

अडथळ्याच्या  नोंदी विषय

१) दिलेल्या व्यवहाराची माहिती असावी.

२) संख्या लेखन वाचन करता यावे.

३) संख्या लेखन करताना चूका नसाव्यात.

४) संख्या उलट सुलट लेखन करतो.

५) संख्या वाचन करताना चूका करतो.

६) चिञ पाहून संख्या सांगता यावी.

७) साधे सोपे हिशोब करता यावे.

८) मापनाची माहिती सांगताना चूका करतो.

९) दिलेली तोंडी उदाहरणे सांगता येत नाहीत.

१०) सुचवलेल्या संख्यांचे वाचन लेखन करता यायला पाहिजे.

११) विविध गणितीय संकल्पना माहिती असावे.

१२) सुचवलेला आलेख चिञ काढता यावी.

१३) चिञ पाहून निरीक्षण करता आले पाहिजे.

१४) वर्ग कार्यात सहभागी असावे.

१५) स्वध्याय उदाहरपणे सोडवावी.

१६) महिना व वारांची माहिती सांगता आली पाहिजे.

१७) संख्या वाचन लेखन करताना चूका करू नये.

१८) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करता आली पाहिजे.

१९) भौमितीय आकाराची माहिती असावी.

२०) मापनाचा उपयोग सांगता यावा.

२१) तोंडी उदाहरणे सोडवावीत.

२२) सूचवलेले पाढे म्हणता यावेत.

२३) विविध आकार काढताना चूका करतो.

२४) स्वध्याय सोडवताना चूका करतो.

२५) संख्या उलट लेखन करतो.

मुल्यमापन नोंदी Daily Observation

दैनंदिन निरीक्षण नोंदी - विषय इंग्रजी

१) Encourage learner while writing

२) Provides practice in matching letter in alphabet

३) He picks outs rhyming word from poem

४) Sign rhymes in tone

५) Make different message

६) Participant in conversion

७) Answer properly for every question

८) Try to develop hand writing

९) He describe his imagination

१०) He prepare invitation cards and greeting cards

११) He frame simple question in English

१२) Help learner at initial stage at writing

१३) demonstrate how to hold a pencil properly

१४) Write neatly and properly

१५) Make spelling of various things

१६) Give a simple instruction

१७) Demonstrate short exchange

१८) Demonstrate short conversion

१९) Provide opportunity to listen rhythm of rhymes

२०) Encourage learner to recite rhymes

२१) displays different rhymes

२२) Conduct readiness activities  

२३) Give learner opportunity to observe of words

२४) Give learner opportunity to groups of words

२५) Organize simple conversational activities for practice

२६) Present model of simple question and answer

२७) Show object picture and say the word aloud

२८) present nursery rhymes prayers action song

२९) He frames meaningful sentence in English o his own

३०) He translate the sentence from English to his mother tongue

मुल्यमापन नोंदी Negative Observation

दैनंदिन निरीक्षण नोंदी - विषय इंग्रजी

tells the wrong story with the help of given points

२) never follows the instruction

३) Never follows the conversation

४) Read with wrong pronunciation

५) Never follows the instruction in act

६) He can’t explain his feelings

७) He can’t describe any simple event

८) He speak roughly in English

९) He use various danger words

१०) He can’t speak on given topic

११) He can’t speak boldly and confidently

१२) He is not able to tell as story using his own words

१३) He can describe his imagination

१४) Never describe pictures in English

१५) Never participant in conversation

१६) He is not able to prepare invitation cards

१७) He gives wrong answer

१८) He doesn't respond in English

१९) He use rough language

२०) He drops hard word while reading

२१) He is unable to participant in conversation

२२) He does not use proper words while prepare

२३) He afraid to speak in English

२४) Structure of project is very bad

२५) Misguide to another student

२६) Never take active participation in given project

२७) Listen wrong

२८) Writing wrong

२९) Reading wrong

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय कला

१) विविध आकार अचूकपणे काढतो.

२) रेषा व त्याचे विविध प्रकार अचूकपणे काढतो.

३) मातीपासून विविध मणी गोल तयार करतो.

४) दिलेल्या पृष्ठभागावर अचीक सजावट करतो.

५) पारंपारीक गीताचे तालासुरात गायण करतो.

कलागट-

१) विविध वस्तूपासून सुबक कलाकृती तयर करतो.

२) कलाकृती काढून आनंद घेतो.

३) विविध कलाकृती तयार करून दाखवतो.

४) मनातील भावना व्यक्त करतो.

५) कलाकृती तयार करण्यास मिञांना मदत करतो.

संगीत

१) स्वताचे आवडते गीत गायन करतो.

२) विविध गीत गायन करून आनंद घेतो.

३) वर्गात समुहगीतात सहभाग घेतो.

४) कृतीयुक्त गीत सादर करतो.

५) परीसरातील विविध पशु पक्ष्यांचा आवाज काढतो.

चिञ शिल्प

१) रेषां व रेषांचे विविध प्रकार अचूकपणे काढतो.

२) आवडीच्या वस्तूवर नक्षीकाम करतो.

३) विविध कागदी आकार तयार करतो.

४) मातीपासून विविध आकार तयार करतो.

५) विविध वस्तू तयार करून दाखवतो.

नृत्यः-

१) प्रणी व पक्षी यांच्या नकला सादर करतो.

२) बडबडगीते म्हणून अभिनय सादर करतो.

३) विविध गीताचे गायन करून हालचाल करतो.

४) प्राणी व पक्षी यांच्या कथा सादर करतो.

५) परीसरातील विविध घटकाचे हवभाव हालचाली करतो.

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन अडथळ्याच्या नोंदी विषय कला

१) वर्ग सजावटीत भाग असावा.

२) चिञ काढण्यास कंटाळा करतो.

३) कृतीचा सराव मन लावून करावा.

४) माती कामात रस असावा.

५) इतरांना कृती कताना मदत करावी.

६) सुचवलेल्या कृती चूकीच्या पध्दतीने करतो.

७) चिञाचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.

८) सुचवलेले गीत गायन करावे.

९) कागद काम करत नाहीचूका करतो.

१०) चिञ रंगवताना रंग व वेळ वाया घालवतो.

११) सूचवलेल्या नृत्याचा प्रकार करावा.

१२) सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता यायला हवे.

१३) दिलेले संवाद व्यवस्थित म्हणावे.

१४) संवाद नक्कल करताना लाजतो.

१५) सुचवलेल्या चिञावर रंगकाम करता यायला हवे.

१६) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.

१७) कागद काम करताना कागदाचा वापर नीट करावा.

१८) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.

१९) गीत गायन करताना हावभाव हालचाली कराव्यात.

२०) सुचवलेले कृतीचे सादरीकरण करावे.

२१) सुचवलेल्या कृतीची माहिती सांगता यावी.

२२) विविध चिञाचे प्रकार ओळखता येत नाहीत.

२३) सुचवलेल्या कलाकृतीचा उपयोग सांगता आला पाहिजे.

२४) वर्गकार्य व उपक्रमात भाग घ्यावा.

२५) मिञासोबत सहकृतीत भाग घ्यावा.

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय कार्यानुभव

अ) संस्कृती -

१) वर्ग सजावटीत सक्रीय भाग घेतो.

२) वर्गातील विविध उपक्रमात भाग घेतो.

३) आपल्या परीसरातील गीतांचे तालासुरात गायन करतो.

४) विविध प्रार्थना गायन करतो.

५) परीसरातील विविध घटकांची माहिती सांगतो.

ब) जलसाक्षरताः-

१) पिण्याच्या पाण्याचा वापर कसा करावा सांगतो.

२) पाण्याचे महत्व थोडक्यात सांगतो.

३) पाण्याविषयी असलेल्या गीतांचे गायन करतो.

४) पाण्याचे महत्व सांगणा-या उपक्रमात भाग घेतो.

५) चिञ पाहून चिञाची माहिती सांगतो.

क) कौशल्याधिष्टीत

१) विविध साधनांचा वापर करून वस्तू बनवतो.

२) ठसे पासून विविध सौदर्य पुरती करतो.

३) कापडापासून विविध वस्तू करतो.

४) विविध कुंड्यांची माहिती सांगतो.

५) विविध कागदी वस्तू बनवतो.

ड) फळ प्रक्रिया

१) विविध फळांची नावे सांगतो.

२) फळांचे रंग व चव याविषयी माहिती सांगतो.

३) फळ बाजाराला भेट देतो.

४) फळ बियांची माहिती सांगतो.

५) फळ वच्याचे विविध प्रकार सांगतो.

इ) मातीकामः-

१) परीसरातील मातीचे नमुने गोळा करतो.

२) मातीचे वरेगीकरण करतो.

३) चिखलापासून विविध वस्तू बनवतो.

४) मातीपासून आपल्या आडीप्रमाणे वस्तू बनवतो.

५) मातीपासून मणी आकार तयार करून दाखवतो.

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन अडथळ्याच्या नोंदी विषय कार्यानुभव

१) उपक्रमात सक्रीयपणे भाग असावा.

२) आपल्या मुलभूत गरजा विषयी माहिती सांगता आली पाहिजे.

३) दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

४) पाण्याचा जपून वापर करावा.

५) आपल्या मिञाना मदत करावी.

६) इतरांच्या वस्तू मोडतो खराब करतो.

७) दिलेल्या सूचना ऐकव्यात.

८) पाण्याचा वापर व महत्व याची जाणीव असावी.

९) दिलेली कृती क्रमाने करावी.

१०) मिञांना कार्यात मदत करावी.

११) दिलेले साहित्य काळजीपूर्वक वापरावे.

१२) अतिशय निष्काळजीपणे काम करतो.

१३) सुचवलेल्या कृती प्रमाणे कृती करावी.

१४) दिलेल्या साहित्याच्या आधारे प्रतिकृती बनवता येत नाहीत.

१५) दिलेल्या सूचना लक्षपूर्व ऐकावे.

१६)  श्रम काम करणे आवड असावी.

१७) काम करताना चूका करतो.

१८) कामाची टाळाटाळ करतो.

१९) सहकार्याची वृत्ती असावी.

२०) वर्गसजावटीत भाग घ्यावा.

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय शारीरिक शिक्षण

१) नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो.

२) वाईट सवयी पासून नेहमी दूर राहतो.

३) दररोज किमान एक तरी आसनन करतो.

४) खेळात सक्रिय भाग घेतो.

५) नखे व केस नियमितपणे कापतो.

६) रोज नियमितपणे दात घासतो.

७) वाईट सवयीपासून स्वतःहून दूर राहतो.

८) व्यायामाचे व विश्रांतीचे महत्व सांगतो.

९) स्पर्धेत आपल्या संघाचे नेतृत्व करतो.

१०) सर्व हालचालीचा सराव करतो.

११) शिकवलेले सर्व व्यायाम प्रकार अचूकपणे करतो.

१२) मैदान स्वच्छ ठेवण्यास मदत करतो.

१३) साहित्यासह हालचाली योग्यपणे करतो.

१४) खेळ खेळताना योग्य ती दक्षता घेतो.

१५) पारंपारीक खेळाची माहिती सांगतो.

१६) आवडत्या खेळाचे नियम सांगतो.

१७) विविध सहशालेय स्पर्धेत भाग घेतो.

१८) सावधान विक्षाम कृती करतो.

१९) सुचवलेल्या आसन करण्याचा प्रयत्न करतो.

२०) शिकवलेले सर्व व्यायम प्रकार करतो.

२१) विचारलेल्या प्रश्नांची अचूक व स्पष्ट उत्तरे देतो.

२२) सुचवलेली कृती क्रमाने अचूक करतो.

२३) खेळ खेळताना नियमांचे अचूकपणे पालन करतो.

२४) स्वतःचा पोशाख स्वच्छ व निटनिटका ठेवतो.

२५) नेहमी चांगल्या सवयी अंगीकारतो.

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन अडथळ्याच्या नोंदी विषय शारीरिक शिक्षण

१) खेळात सक्रिय भाग घ्यावा.

२) चांगल्या आरोग्याच्या सवयी अंगीकाराव्यात.

३) स्वतःचा पोशाख स्वच्छ असावा.

४) विचारलेली माहिती व्यवस्थित सांगावी.

५) वैयक्तीक शर्यतीत सक्रिय भाग घ्यावा.

६) स्वच्छतेचे महत्व माहिती असावे.

७) क्रिडांगण स्वच्छ ठेवावे.

८) विविध पारंपारीक खेळांची नावे सांगता येत नाहीत.

९) वाईट सवयी सांगतो पण त्या नसाव्यात.

१०) खेळायला सांगितल्यावर कारणे सांगतो.

११) वाईट सवयीच्या लवकर आहारी जातो.

१२) सुचवलेली व्यायाम कृती करावी.

१३) कवायत प्रकार करता आले पाहिजे.

१४) साहित्यासह व्यायम प्रकार करता यावा.

१५) आवडत्या खेळाचे नियम सांगता आले पाहिजे.

१६) व्यायामाचे महत्व सांगता यावे.

१७) नखे व केस वेळच्या वेळी कापावी.

१८)  खेळाची आवड असावी.

१९) नेहमी आजारी पडतो.

२०) खेळ खेळताना खिलाडू वृत्ती असावी.

२१) वर्गात शिक्षक नसताना गोंदळ नसावा.

२२) सांघिक खेळात भाग घ्यावाकरत.

२३) सुचविलेल्या व्यायम प्रकारात चूका करतो.

२४) दिलेला व्यायाम प्रकार क्रमाने करता यावी

२५) चांगल्या सवयी अंगी बाळगाव्यात.

दैनंदिन निरीक्षण नोंदी - विशेष प्रगती

१) शालेय शिस्त आत्मसात करतो.

२) दररोज शाळेत उपस्थित राहतो

३) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो

४) कविता पाठांतर करतोसुरात गातो.

५) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो.

६) अभ्यासात सातत्य आहे.

७) वर्गात क्रियाशील असतो.

८) अभ्यासात नियमितता आहे

९) वर्गात लक्ष देवून ऐकतो.

१०) गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो.

११) अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो.

१२) उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो.

१३) वर्गात नियमित हजर असतो .

१४) खेळण्यात विशेष प्रगती आहे.

१५) Activity मध्ये सहभाग घेतो.

१६) सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो.

१७) विविध प्रकारची चित्रे काढतो.

१८) वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो.

१९) गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो.

२०) सर्व विषयाचा अभ्यास उत्तम आहे.

२१) कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.

२२) वाचन स्पष्ट उच्चारात करतो.

२३) शब्दांचे वाचन स्पष्ट करतो.

२४) शालेय उपक्रमात सहभाग घेतो.

२५) शिक्षकाविषयी आदर बाळगतो.

मूल्यमापन नोंदी

सुधारणा आवश्यक 

१) वाचन,लेखनाकडे सराव आवश्यक.

२) अभ्यासात सातत्य आवश्यक.

३) संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सराव आवश्यक.

४) नियमित शुद्धलेखन सराव आवश्यक.

५) गणित विषय संख्यावरील क्रिया सराव आवश्यक.

६) गणित बेरीज घटक सराव आवश्यक.

७) मराठी वाचन लेखन सराव आवश्यक.

८) मराठी उच्चर सराव आवश्यक.

९) गटकार्यात सहभाग वाढवणे आवश्यक.

१०) गणितीक्रियाकडे लक्ष देणे आवश्यक.

११) लेखनातील चुका टाळाव्या.

१२) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा

१३) नियमित अभ्यासाची सवय लावावी.

१४) नियमित उपस्थित राहावे.

१५) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.

१६) वाचन व लेखनात सुधारणा करावी.

१७) अक्षर सुधारणे आवश्यक

१८) भाषा विषयात प्रगती करावी.

१९) स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.

२०) दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.

२१) संवाद कौशल्य आत्मसात करावे.

२२) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.

२३) वैयक्तीक ओरोग्याकडे लक्ष द्यावे.

२४) गणितातील मांडणी योग्य करण्याकडे लक्ष द्यावे.

२५) गुणाकारात मांडणी योग्य करण्याकडे लक्ष द्यावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या