Breaking News

वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण New Update

 वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण 

New Update


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे तर्फे आयोजित रिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली होती . आपणास सदर यादी https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे.

  मात्र नोंदणी केलेल्या काही शिक्षकांचे Email -ID मध्ये काही चुका असल्याने अथवा काही प्रशिक्षणार्थींचे एकच ईमेल आय.डी एका पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आल्यामुळे महत्वाचे मॅसेज प्राप्त होणार नाहीत. कारण प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.

   अशा Email-ID मध्ये बदल असणाऱ्या प्रशिक्षणार्थीं यादी http://training.scertmaha.ac.in/ देण्यात आली आहे. 

   आपणास Email-ID बदल करावयाचा असल्यास वरील पोर्टल मध्ये " नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया " या टॅब वर जाऊन आपण आपला Email-ID दुरुस्ती करून घ्यावा.

💁 https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist1.aspx

"अवैध ईमेल यादी " या टॅब वर क्लीक केल्यास आपणास प्रशिक्षणार्थी यादी दिसेल अशांनी Email-ID मध्ये चूक असेल त्यात दुरुस्ती करून घ्यावी. मात्र अचूक असल्यास पुढील कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

💁  https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist2.aspx

" दुबार ईमेल यादी " या टॅब वर क्लीक केल्यास एका पेक्षा जास्त वेळा ई-मेल ID वापरण्यात आल्यामुळे महत्वाचे मॅसेज प्राप्त होणार नाहीत. यासाठी ई-मेल ID मध्ये बदल करून घ्यावा.

💁 व्हिडिओ पहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या