Breaking News

MAHA DBT PORTAL योजनेबाबत अंमलबजावणी शैक्षणिक वर्षे 2024-25

महाडीबीटी पोर्टलवर शालेय शिक्षण विभागाच्या योजनांची शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत..


   राज्याच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. महाडिबीटी पोर्टलवर शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या खालील 02 शिष्यवृत्ती योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. 

(1) कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील गुणवत्ता शिष्यवृत्ती

(2) आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती 


     महाडिबीटी पोर्टलवर विदयार्थाना शिष्यवृत्तीचे अर्ज भरणेसाठी सहाय्य व्हावे तसेच कनिष्ठ महाविदयालयातील लिपीक, प्राचार्य व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांना अर्जाची पडताळणी करणेसाठी सहाय्य व्हावे या साठी महाडिबीटी पोर्टलवर मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करत असतांना उक्त दोन्ही योजनांसाठी महाडिबीटी पोर्टलवर कार्यवाही करतांना सदर योजनेची माहिती ही आपल्या क्षेत्रिय स्तरावरील सर्व विदयार्थाना व कनिष्ठ महाविदयालयांना ही प्राप्त होणे व त्याचा प्रसार होणे महत्वाचे असल्याने योजनेचे स्वरूप थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.

📣 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शासकीय खुली गुणवत्ता या शिष्यवृत्ती संदर्भात :-

     सन १९७६-७७ पासून कनिष्ठ महाविद्यालयातील टप्पा अस्तित्वात आल्यापासून या स्तरावरील विद्यार्थ्यांना खुल्या गुणवत्ता शिष्यवृत्या देण्यात येतात. माध्यमिक शालांत परिक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळविणाया विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ही शिष्यवृत्ती देण्यात येते. समाधानकारक प्रगती आणि कनिष्ठ महाविद्यालय पहिल्या वर्षाच्या (इ. ११ वी च्या) अखेरीस घेण्यात येणाऱ्या परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्या इयत्ता १२ वी पर्वत चालू राहते. सदर योजना ही डीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती साठी जिल्हयानुसार संच संख्या ठरवून देण्यात आलेली आहे.

इयत्ता ११ वी व १२ वी चे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्याथ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbtmahait.gov.in शिष्यवृत्ती मिळणेकरिता अर्ज करण्यात येतो. विद्याथ्यांनी DBT PORTAL वर उपरोक्त योजनांसाठी भरलेले अर्ज कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर पडताळणी केले जाते.

  कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरुन पडताळणी केलेले अर्ज जिल्हास्तरावरुन पडताळणी झाल्यानंतर जिल्हयांना दिलेल्या शिष्यवृत्तीच्या संचनिहाय एकदाच गुणवत्ता यादी पोर्टलद्वारे तयार केली जाते. व गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना PFMS द्वारे विद्याथ्यांच्या आधार लिंक बैंक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग केली जाते. या दोन्ही योजनांचे जिल्हास्तरावरील प्रलंबित अर्जाची पडताळणी तात्काळ करणे आवश्यक आहे. सदर योजना ही डीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती साठी जिल्हयानुसार शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक १०९५/(८५/९५) माशी ८ दिनांक १५ ऑक्टोबर १९९६ अन्वये संच संख्या ठरवून देण्यात आलेली आहे

📣 आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती संदर्भात :-

 आर्थिकदृष्ट्या मागसवर्गातील हुशार मुले मुली जे माध्यमिक शालांत परीक्षेत पहिल्याच वेळी शेकडा ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत अशाना पुढील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही शिष्यवृत्ती देण्यात येते. इयत्ता ११ वी मध्ये ५० टक्के गुण मिळवून पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती १२ वी पर्यत चालू राहते. ही शिष्यवृत्ती फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरासाठी उपलब्ध आहे. ही शिष्यवृत्ती योजना डीबीटी पोर्टलमार्फत कार्यान्वित आहे.

सदर योजनेचे सर्व शाखांचे प्रस्ताव संबंधित शाळेमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे प्राप्त होतात. सदर प्रस्तावाची तपासणी संचालनालयाच्या स्तरावर करण्यात येते. व मेरीटनुसार त्यास मंजूरी संचालनालय स्तरावरून देण्यात येते. सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांच्या बैंक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलमार्फत जमा करण्यात येतो. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एससीएच/८५/९५/माशि-८ दिनांक १५/१०/९६ च्या निर्णया अन्वये ३२०० शिष्यवृत्या मंजूर केल्या आहेत. शिष्यवृत्तीचे दर वसतीगृहात राहणारे विद्यार्थी व वसतीगृहात न राहणारे विद्यार्थी यांचे वेगवेगळे आहे. आर्थिकदृष्ट्या मागसवर्गातील हुशार मुले मुली जे माध्यमिक शालांत परीक्षेत पहिल्याच वेळी शेकडा ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत अशाना पुढील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही शिष्यवृत्ती देण्यात येते. इयत्ता ११ वी मध्ये ५० टक्के गुण मिळवून पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती १२ वी पर्वत चालू राहते. ही शिष्यवृत्ती फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरासाठी उपलब्ध आहे. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एससीएच/८५/९५/माशि-८ दिनांक १५/१०/९६ च्या निर्णयाअन्वये शिष्यवृती मंजूर केली जाते. शिष्यवृत्तीचे दर बसतीगृहात राहणारे विद्यार्थी व वसतीगृहात न राहणारे विद्यार्थी यांचे वेगवेगळे आहे.

💁 उक्त दोन्ही योजना राबविण्यात येतांना सर्वसाधारण महत्वाच्या सूचना आहेत , त्या खालील प्रमाणे आहेत.

👉 विद्यार्थ्यांसाठी सूचना :-

● उपरोक्त शिष्यवृत्तीसाठी या लिंकद्वारे महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● शिष्यवृत्तीचे शासन निर्णय अटी-शर्ती देव लाभ यांचे अवलोकन केले असता, विदयार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

● विद्यार्थी महाडिबीटी पोर्टलद्वारे लागू असलेल्या एकापेक्षा अधीक शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरू शकतात तथापि संबंधित विदयार्थास त्यांनी निवडलेल्या पसंतीक्रमानुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार असल्याने शिष्यवृत्तीचा पसंतीक्रम काळनीपूर्वक नोंदविण्यात यावा.

● विद्यार्थ्यांनी अर्जासोबत शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

● विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जामध्ये गुण नोंदवितांना गुण टक्केवारीमध्ये नोंदविणे आवश्यक आजे. संच निर्धारित असलेल्या शिष्यवृत्तीसाठी लाभाथ्यांची निवड शिष्यवृत्तीच्या अटीनुसार करण्यात येते याची नोंद घेण्याबाबत निर्देशित करणे.

● शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांकाचा वापर करून अर्ज भरता येतो, विदयार्थाना शिष्यवृत्तीच रक्कम आधार संलग्नित बैंक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे बैंक खात्याशी आधारक्रमांक संलग्ण करणे आवश्यक आहे.

● ऑनलाईन अर्ज भरतांना काही अडचणी निर्माण झाल्यास महाविदयालय/संस्थेच्या मदतीने पुर्ण करून घेण्यात यावा.

● विद्याथ्यांने ऑनलाईन अर्ज भरतांना विचारण्यात आलेली माहिती पूर्णपणे अचूक भरून ऑनलाईन अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह आपल्या महाविदयालयांकडे पुढील ती कार्यवाही करीता सादर करावी.

👉 कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सूचना :-

● विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेला शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणीसाठी प्रथम संबंधित महाविदयालयाच्या लिपिक लॉगीनमध्ये पडताळणीसाठी उपलब्ध होतात.

● शिष्यवृत्तीचे शासन निर्णय अटी-शर्ती लाभ आदि बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास करून महाविदयालयातील लिपीकांनी विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करावी.

● शिष्यवृत्ती निहाय आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांनी पोर्टलवर अपलोड केली असल्याची खात्री करावी, तसेच सबंधित विद्यार्थ्याने अर्जामध्ये भरलेली माहिती (अभ्यासक्रमाचे नाव, अभ्यासक्रमाचा प्रकार (अनुदानित /विनाअनुदानित) अभ्यासक्रम कालावधी, प्रवेशाबाबतची माहिती, टक्केवारी, शिष्यवृत्तीचा लाभ, इत्यादी काळजीपूर्वक पडताळणी करणे आवश्यक आहे.) महाविद्यालयाच्या लिपीकांनी त्यांचे लॉगीनवर आलेल्या अर्जावर तातडीने कार्यवाही (Approve/Reject/Sent Back) करणे आवश्यक आहे.

● कनिष्ठ महाविद्यालयाच्या लिपीकांनी मंजूर (Approve) केलेले शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणीसाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीनवर उपलब्ध होतात.

● कनिष्ठ महाविदयालयातील प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या लिपीकांप्रमाणेच विदयार्थाच्या शिष्यवृत्ती अर्जाची पडताळणी करून सदर अर्जावर तातडीने (Approve/Reject/Sent Back) कार्यवाही करणे आवश्यक आहे.

● तसेच विद्यार्थ्यांच्या अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसहीत जतन करून ठेवण्यात यावी.


📣 योजना :

💁 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती :-

योजनेचे स्वरूप :-

   सन १९७६-७७ पासून कनिष्ठ महाविद्यालयातील टप्पा अस्तित्वात आल्यापासून या स्तरावरील विद्यार्थ्यांना खुल्या गुणवत्ता शिष्यवृत्या देण्यात येतात. माध्यमिक शालांत परिक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळविणाया विद्याथ्यांना गुणवत्तेनुसार ही शिष्यवृत्ती देण्यात येते. समाधानकारक प्रगती आणि कनिष्ठ महाविद्यालय पहिल्या वर्षाच्या (इ. ११ वी च्या अखेरीस घेण्यात येणाऱ्या परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्या इयत्ता १२ वी पर्यंत चालू राहते. सदर योजना ही डीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती साठी जिल्हयानुसार संच संख्या ठरवून देण्यात आलेली आहे. इयत्ता ११ वी व १२ वी चे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्याथ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbtmahait.gov.in शिष्यवृत्ती मिळणेकरिता अर्ज करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी DBT PORTAL वर उपरोक्त योजनांसाठी भरलेले अर्ज कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर पडताळणी केले जाते, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरुन पडताळणी केलेले अर्ज जिल्हास्तरावरुन पडताळणी झाल्यानंतर जिल्हयांना दिलेल्या शिष्यवृत्तीच्या संचनिहाय एकदाच गुणवत्ता यादी पोर्टलद्वारे तयार केली जाते. व गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना PFMS द्वारे विद्याथ्यांच्या आधार लिक बैंक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग केली जाते. या दोन्ही योजनांचे जिल्हास्तरावरील प्रलंबित अर्जाची पडताळणी तात्काळ करणे आवश्यक आहे. (Student Principal District Education Officer- PFMS Payment to Student)

👉 इ.11 वी - दहा महिन्यासाठी 500 रु

👉 इ.12 वी - दहा महिन्यासाठी 500 रु

■ योजनेचे लाभार्थी निकष व आवश्यक कागदपत्रे 👇 :-

● माध्यमिक शालांत परिक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक, 

●कनिष्ठ महाविद्यालय पहिल्या वर्षाच्या (इ. ११ वी च्या ) अखेरीस घेण्यात येणाऱ्या परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळविल्यास इयत्ता १२ वी मध्ये शिष्यवृत्ती पुढे चालू राहते.

● डीबीटी पोर्टलमार्फत विद्याव्यर्थाने विहित मुदतीत अर्ज करणे आवश्यक.

📣 योजना

💁 आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती :-

योजनेचे स्वरूप :-

  आर्थिकदृष्टया मागसवर्गातील हुशार मुले मुली जे माध्यमिक शालांत परीक्षेत पहिल्याच वेळी शेकडा ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत अशाना पुढील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही शिष्यवृत्ती देण्यात येते. इयत्ता ११वी मध्ये ५० टक्के गुण मिळवून पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत चालू राहते. हो शिष्यवृत्ती फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरासाठी उपलब्ध आहे. ही शिष्यवृत्ती योजना डीबीटी पोर्टलमार्फत कार्यान्वित आहे. सदर योजनेचे सर्व शाखांचे प्रस्ताव संबंधित शाळेमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे प्राप्त होतात. सदर प्रस्तावाची तपासणी संचालनालयाच्या स्तरावर करण्यात येते. व मेरीटनुसार त्यास मंजुरी संचालनालय स्तरावरून देण्यात येते. सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांच्या बैंक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलमार्फत जमा करण्यात येतो.

योजनेचे उद्दिष्टे :-

    शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एससीएच/८५/९५/माशि-८ दिनांक १५/१०/९६ च्या निर्णया अन्वये ३२०० शिष्यवृत्या मंजूर केल्या आहेत. शिष्यवृत्तीचे दर वसतीगृहात राहणारे विद्याची व वसतीगृहात न राहणारे विद्यार्थी यांचे वेगवेगळे आहे. आर्थिकदृष्ट्या मागसवर्गातील हुशार मुले मुली जे माध्यमिक शालांत परीक्षेत पहिल्याच वेळी शेकडा ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत अशाना पुढील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही शिष्यवृत्ती देण्यात येते. इयत्ता ११ वी मध्ये ५० टक्के गुण मिळवून पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत चालू राहते. ही शिष्यवृत्ती फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरासाठी उपलब्ध आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :-

◆ माध्यमिक शालांत परिक्षेत कमीत कमी ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक.

◆ कनिष्ठ महाविद्यालय पहिल्या वर्षाच्या (इ. ११ वी च्या अखेरीस घेण्यात येणाया परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात किमान ५० टक्के गुण मिळविल्यास इयत्ता १२ वी मध्ये शिष्यवृत्ती पुढे चालू राहते.

◆ डीबीटी पोर्टलमार्फत विद्याथ्यांने विहित मुदतीत अर्ज करणे आवश्यक.

◆  बी. सी. योजनेतंर्गत को सवलतीसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.८,००,०००/- पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या