Breaking News

केंद्रप्रमुख भरती स्पर्धा परीक्षा - सराव प्रश्नपत्रिका 7

  केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023

     महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०१३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे.


💁 पात्रता:

■ फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

■ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवारा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम. बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

■वभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील

■ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी पात्र राहतील.

💁 आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतूदी

 ■ दिव्यांग आरक्षण :-  

● दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. दिव्यांग २०१८/प्र.क्र. ११४/१६ अ, दिनांक २९/०५/२०१९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, 

● दिव्यांग व्यक्तीची संबंधित संवर्ग पदांकरीता पात्रता शासनाकडून वेळो वेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील,

● संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकाराचे किमान ४० टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी सवलतीसाठी पात्र असतील.

● दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणान्या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रनि २०१८/प्र.क्र. ४६ आरोग्य ६. दि. १४/०९/२०१८ मधील आदेशानुसार केंद्रशासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीव्दारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

💁 परीक्षा योजना :-

◆ परीक्षेचे टप्पे एक लेखी परीक्षा

◆  परीक्षेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५.३ प्रश्नपत्रिका एक

◆ एकूण गुण २००

◆ लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम:- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील.

■ अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वतः चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.

■ ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.

■ "प्रस्तुत परीक्षे करीता अर्ज विचारत घेण्यास गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कोणताही आक्षेप असल्यास तसे गटशिक्षणाधिकारी यांनी अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर ५ दिवसाचे आत परीक्षा परिषदेस कळविणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरीता अर्ज विचारत घेण्यास हरकत नसल्यास परीक्षा परिषदेस तसे कळविण्याची आवश्यकता नाही असेही उमेदवाराने संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना कळवावे.

■ प्रस्तुत परीक्षा हो स्पर्धा परीक्षा असून पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा (Qualifying Examination) नाही,

■  परीक्षेच्या निकालाच्या आधारे परीक्षा परिषदेकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची पात्रता सक्षम प्राधिकान्याकडून तपासली जाईल. सदर परीक्षेमधील उमेदवाराच्या कामगिरीच्या (Performance) आधारे नियुक्ती मागण्याचा उमेदवारास कोणताही हक्क असणार नाही.

■ परीक्षेस अर्ज सादर केल्यानंतर अथवा परीक्षा दिल्यानंतर उमेदवाराने राजीनामा दिल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास अथवा सक्षम प्राधिकारी यांनी सेवा समाप्त केल्यास अथवा धारणाधिकार न ठेवता संवर्गबाहय पदावर नेमणूक झाल्यास सदर परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असणार नाही.

■ अर्जामधील नमूद माहितीच्या आधारे जाहीरातीमधील विहित अर्हतेबाबतच्या अटींची पूर्तता करतात असे समजून पचता न तपासता उमेदवारांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल, परंतु परीक्षेपूर्वी अथवा परीक्षेनंतर कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने अर्जात नमूद केलेली माहिती चुकीची वा खोटी असल्याचे अथवा उमेदवार विहित अतिची पूर्तता करीत नसल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टण्यावर रद्द करण्यात येईल आणि त्याबाबतचा परीक्षा परिषदेचा निर्णय अंतिम राहील.


💁 प्रवेशपत्र :-

        परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येतील, त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. १०.२ परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किया स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स या पैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्ही नावामध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये. उमेदवारांच्या नावात बदल इ लेला असल्यास त्यासंबंधित विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्राची प्रत अथवा प्रतिज्ञापत्र याची मूळ तसेच छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.


💁  परीक्षेस प्रवेश :-

● फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सुचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल.

● स्मार्ट वॉच, डिजिटल बाँच, मायक्रोफोन, मोबाईल कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड ब्लू दूध, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणत्याही वस्तू कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वहया, नोट्स, पुस्तकें, बॅग्ज, परिगणक (Calculator) इत्यादी प्रकारची साधने साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतःजवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य उमेदवारांनी आणल्यास ते परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अथवा परीक्षा केंद्र व्यवस्थापन अथवा परीक्षा आयोजक जबाबदार राहणार नाहीत.

● महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती / जाहिरात अधिकृत समजण्यात येईल. 

●सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

● सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास msee.kpexam2023/@gmail.com या ईमेल वर संपर्क साधता येईल.

👩‍💻 केंद्रप्रमुख भरती परीक्षा 👩‍💻

सराव प्रश्नपत्रिका - 7

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या