Breaking News

Udise Plus Aadhar Validation New Update

 विद्यार्थी व शिक्षकांचे आधार वेलिडेशन यु-डायस प्लस सन २०२२-२३ प्रणालीमध्ये नोंदणी पूर्ण करून घेणेबाबत.


     यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक यांची माहिती सविस्तर नोंदणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. दि. ०६ जुलै, २०२३ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार २,०३,७६,८६५ एवढे विद्यार्थ्यांपैकी ९१,६२,३४२ (४५%) विद्यार्थ्यांचे आधार वेलिडेशन पूर्ण झालेले आहे. आणि ७,४१,७९६ एवढे शिक्षकांपैकी ४,८९,००३ (६६%) शिक्षकांचे आधार बेलिडेशन पूर्ण झालेले आहे.

     संदर्भिय भारत सरकारकडील पत्रानुसार समग्र शिक्षा योजनेतून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभाच्या योजना मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, RTE प्रवेश, द्विव्यांग विद्यार्थ्यानांकरिता देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, स्कॉलरशिप इत्यादीकरिता विद्यार्थ्यांचे आधार वेलिडेशन १००% पूर्ण करून घेण्याकरिता नमूद केले आहे. त्याचप्रमाणे शासकीय व अनुदानित शाळांमधील १००% शिक्षकांचे वेलिडेशन पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

    आधार वेलिडेशन करतांना तांत्रिक अडचणी येत असल्यास समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत जिल्हा व तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर, MIS-Co-ordinator, डाटा एन्ट्री ऑपरेटर, टॅक्नोसेवी शिक्षक यांची मदत घेण्यात यावी. याबाबत आपणास कळविण्यात येते की, शासनाकडून देण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची आधार वेलिडेशन तात्काळ पूर्ण करून घेण्यात यावे कारण पुढील वर्षीचे बजेट याच शाळा, विद्यार्थी व शिक्षक संख्येवर आधारित असेल त्यामुळे कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही. याची खात्री करावी अन्यथा केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार नाही याची नोंद घ्यावी. सोबत यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०६ जुलै, २०२३ रोजीचा जिल्हानिहाय विद्यार्थी व शिक्षक आधार वेलिडेशनबाबतचा अहवाल माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.


💁 महत्वाचे परिपत्रक 👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या