Breaking News

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023

 शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 साठी मुदतवाढ देणेबाबत..



   शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 11 मे 2023 नुसार शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक प्रशिक्षक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुली स्पर्धा 2023-24 चे शासनामार्फत आयोजन करण्यात येत आहे. सदरच्या स्पर्धेचे नामांकन प्रक्रिया दिनांक 01 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होत आहे.

   सदरच्या चळवळीच्या माध्यमातून संकलित करण्यात येणारे ई-साहित्य हे राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे साठी संदर्भीय तसेच अध्ययन पूरक ठरणार आहेत. सदरच्या खुल्या स्पर्धेचे निकष, गटनिहाय विषय व पारितोषिकाबाबत सविस्तर तपशील https://tinyurl.com/bivwja5d या दि. 11/05/2023 चे शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे. दिनांक 01 ऑगस्ट, 2023 ते 15 ऑक्टोबर, 2023 पर्यंत https://scertmaha.ac.in/vcomp2023/ या लिंकवर क्लिक करून सदरच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना या प्रणालीवर आपले नामांकन करता येईल तसेच या प्रणालीवर स्पर्धेबाबतचा सर्व तपशील व निकष उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

   दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपामध्ये; तर विजेत्या उमेदवारांना शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पारितोषिके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या स्पर्धेबाबतच्या सविस्तर निकष देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत लवकरच निर्गमित केले जातील. तरी जास्तीत जास्त शिक्षक/ मुख्याध्यापक / शिक्षक प्रशिक्षक यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

   दिनांक 01 ऑगस्ट 2023 पासून शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 सुरु आहे.सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 ऑगस्ट 2023 देण्यात आली होती. संदर्भ क्रमांक ३ नुसार राज्यातील विविध शिक्षक व शिक्षक संघटनांमार्फत स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याची मुदतवाढ करणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे.

  प्रस्तुत स्पर्धेबाबत सविस्तर सूचना देण्याचे व स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करून प्रस्तुत स्पर्धेबाबत खालील निर्णय घेण्यात येत आहेत.

● स्पर्धेमध्ये भाग घेण्याची (व्हिडीओसह नावनोंदणी) मुदत दिनांक 15/10/2023 पर्यंत वाढविण्यात येत आहे.

● विद्यालयांची संख्या विचारात घेता इयत्ता 11 वी 12 वी गट व अध्यापक विद्यालय गट या दोन्ही गटाचे मूल्यांकन तालुका ऐवजी जिल्हा स्तरावरून सुरु होईल. त्यामुळे प्रस्तुत गटातील उमेदवार फक्त जिल्हा स्तरापासून पुढील प्रक्रियेस पात्र असतील.

● इयत्ता 11 वी 12 वी गटामध्ये भाग घेण्यासाठी वा शाखानिहाय राज्य शिक्षण मंडळाचे सर्व विषय समाविष्ट करण्यात येत आहेत.

● तालुका समन्वयक स्पर्धेसाठी तालुका समन्वयक म्हणून प्रत्येक तालुक्यासाठी एका विस्तार अधिकाऱ्याची - नेमणूक करावी. त्यांनी केंद्रातून जास्तीत जास्त शिक्षक या स्पर्धेत सहभागी होतील याबाबत केंद्रप्रमुखांचा आढावा घ्यावा. तालुक्यातून प्रत्येक गटातील प्रत्येक इयत्तेतील दिलेल्या विषयासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ निर्मिती होऊन त्यामधून त्या-त्या इयत्तेच्या सर्व अध्ययन निष्पत्ती साध्य होतील व भविष्यात तालुक्याच्या शैक्षणिक उपयोगासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ तयार होतील याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. यासाठी केंद्रप्रमुख यांचे स्तरावर बैठका घेऊन योग्य ते नियोजन करण्यात यावे. याबाबत तालुका समन्वयकांनी आवश्यकतेनुसार त्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व डायट संपर्क अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.

● केंद्रप्रमुख - केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्राची ऑनलाईन/ ऑफलाईन बैठक घेऊन अधिकाधिक शिक्षक सदर स्पर्धेत भाग घेतील हे पहावे. तसेच तालुका समन्वयकाशी चर्चा करून तालुक्याच्या गरजेनुसार स्पर्धा गटात इयत्तेनुसार, विषयानुसार आशय वैविध्य आणून व्हिडिओ स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिक्षकांना व्हिडिओ निर्मितीसाठी आशय अध्ययन निष्पत्ती निवडण्यास प्रोत्साहित करावे. तालुका समन्वयकाच्या मार्गदर्शनाखाली विषयात व आशयात वैविध्य येण्यासाठी केंद्रप्रमुख आपल्या केंद्राचे नियोजन करू शकतील. याबाबत केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रात बैठक घेऊन योग्य त्या सूचना व प्रेरणा द्यावी.

● विषय वैविध्य राखून जास्तीत जास्त व्हिडिओ बनविले जात आहेत याबाबत तालुका समन्वयक तालुक्याचा व केंद्रप्रमुख केंद्राचा दैनंदिन आढावा घेतील.

● स्पर्धात्मक वातावरण रहावे म्हणून प्रत्येक स्तरासाठी प्रत्येक तालुका/गटातील शाळा संख्येच्या किमान 30 % व्हिडिओ नोंदणी होणे गरजेचे आहे अन्यथा संबंधित गट स्पर्धेतून बाद ठरविला जाईल.

● प्रस्तुत स्पर्धेत जास्तीत जास्त नोंदणी करणाऱ्या पहिल्या 10 तालुक्यांना (गटशिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी, डाएट संपर्क अधिकारी, विस्तार अधिकारी 01 व केंद्रप्रमुख) व पहिल्या 3 ( प्राचार्य डाएट शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, आय. टी. विभागाचे वरिष्ठ अधिव्याख्याता - 01) जिल्ह्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

● प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची एक संयुक्त बैठक (पत्र मिळाल्यापासून 2 दिवसात) घेऊन याबाबत सविस्तर सूचना द्याव्यात.

● एखाद्या गटामध्ये व्हिडिओ मुल्यांकन करण्यासाठी विषयनिहाय विशेष तज्ज्ञता असलेले अतिरिक्त तज्ज्ञ परीक्षक आवश्यक असल्यास तालुका / जिल्हा/राज्य निवड व सनियंत्रण समिती आवश्यकतेनुसार या कामासाठी अतिरिक्त विषयनिहाय तज्ज्ञ परीक्षक नेमू शकते. सदर अतिरिक्त तज्ज्ञास याबाबतचे गौरवपत्र देण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या