Breaking News

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS)

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर ऑनलाईन अर्ज भरणेबाबत..



 शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMMSS) शैक्षणिक प्रकल्प वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर नवीन व नुतणीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता पोर्टल उघडणेबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलेले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता डी बी टी मिशन, कॅबिनेट सचिवालय यांनी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाशी सदर प्रकरणी चर्चा केली व उक्त कार्यवाही करण्याकरीता कालमर्यादा ठरवून दिलेल्या आहेत, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी एनएसपी पोर्टल साठी ठरविण्यात आलेल्या कालमर्यादा खालील प्रमाणे आहेत.

Opening of Portal :- 1st October, 2023

Last date for Application submission :- 30th November, 2023

Last date for INO Level Verification :- 15th December, 2023

Last date for Second Level Verification :- 30th December, 2023

     शैक्षणिक वरील बाबी लक्षात घेता, केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जिल्हयांनी नवीन व नुतणीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची कामे उक्त प्रमाणे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, तसेच यावर्षी कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी नोंदणी करतांना वय वर्ष १८ पूर्ण असणे आवश्यक असून त्याचे आधार असणेही अनिवार्य आहे. ज्या विद्याथ्यांनी अदयापही आधारकार्ड काढलेले नाही, त्या विद्यार्थ्यांनी आधारकार्ड साठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे तसेच त्यांनतर नावनोंदणी ( eKYC) वापरून पोर्टलला नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर आधार बाबत संपूर्ण तपशिल सबमिट होईपर्यंत आणि ई के वाय सी होईपर्यंत सदर विद्यार्थ्यांची नोंदणी तात्पुरती असेल. शिष्यवृत्ती पात्र / अपात्र या बाबीसाठी आधार महत्वाचे असेल.

अल्पवयीन अर्जदारांसाठी सर्व अर्जदार ज्यांनी नोंदणीच्या तारखेला १८ वर्षांचे वय पूर्ण केले नाही, त्यांना त्यांच्या पालकांच्या / कायदेशीर पालकांच्या संमतीने ऐच्छिक आधारावर आधार वापरून नोंदणी करण्यास प्रोत्साहित केले जाईल. जर अशा अर्जदारांना आधारकार्ड दिलेले नसेल तर ईआयडी वापरून नोंदणी करता येऊ शकेल, तथापि सदर प्रकरणी अल्पवयीन अर्जदारांना आधारकार्ड प्रदान केलेला नसेल, किमान एक पालक किंवा कायदेशीर पालकांचा आधारकार्ड चा वापर करता येईल. अशा प्रकरणी एक पालक किंवा कायदेशीर पालकांना लाभाची मानले जाईल.

   अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आधारकार्ड शिवाय नोंदणी केल्यास, त्यांना ऐच्छिक आधारावर आधार जमा करण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी नियमित एसएमएस पाठविले जातील.

   ईआयडी च्या बाबतीत आधारकार्ड होईपर्यंत शिष्यवृत्तीचे वितरण होणार नाही.

   दोन्ही प्रकरणांमध्ये आधार हस्तगत केला जात असल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र काढून टाकण्यात आले आहे.

■ केंद्र शासनाच्या दि. १९/ ०३ / २०२२ परिपत्रकामधील खालील सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

● पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे.

● शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे.

● केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्याथ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.

● इयत्ता १०वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.

● इयत्ता १० वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास ०५ टक्के सूट) इयत्ता ९ वी मधून १० वी मध्ये गेलेले विद्यार्थी व ११ वी मधून १२ वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.

● शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे.

● शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असावे व विद्याथ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे,

● विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

● विद्यार्थ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल.

● जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल.

● कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाही.

● शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्यांचा दावा विचारात घेतला जाणार नाही.

■ ऑनलाईन माहिती भरण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

● एखाद्या विद्यार्थ्याने चुकीची माहिती भरली असल्यास त्यास Defect करावे Reject करु नये. जो विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्रच नाही तरी पण त्याने माहिती भरली असल्यास त्यास Reject करावे.

● Registration Details मध्ये Community / Categary या कॉलम मध्ये विद्यार्थी ज्या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. तो प्रवर्ग (SC/ST/OBC GENRAL) निवडावा. जे विद्यार्थी (SBC) VINTNT-1, NT-2, NT-3, NT-D) या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहे त्यांनी जनरल हा प्रवर्ग निवडून माहिती भरावी.

● Academic Details Competitive Exam Qualified 7 NMMSS faga. Exam Conducted by मध्ये महाराष्ट्र टाकावे. Competitive Exam Roll No. मध्ये सन २०२२ परीक्षा दि.१९/०६/२०२२ इ.९ वी करीता M/BU वगळून फक्त संख्यात्मक १२ अंकी परीक्षा क्रमांक टाकणे आवश्यक आहे.

● Admission Fees Tution Fees, Mise Fess यामध्ये टाकण्यात यावा. यामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये.

● Basic Details मधील Marital Status मध्ये Unmarried निवडावे Parents Profession मध्ये Other हा पर्याय निवडावा.

● Previous Board/University Name Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary, Pune निवडावे.

      शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशील (IFSC CODE, BANK ACCOUNT NUMBER ETC) योग्य टाकण्यात यावा. सन २०२२ (Fresh) ची विद्याथ्र्यांची माहिती पोर्टल वर अपडेट झाली असून सदर पोर्टल है ऑनलाईन व कालमर्यादित असल्यामुळे आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत येणान्या प्रत्येक शाळेने पात्र विद्यार्थ्यांची अचूक माहीती पोर्टलवर विहीत मुदतीत भरणे बंधनकारक आहे. सदर विद्याथ्यांची माहिती भरण्यास विलंब व कोणतीही टाळाटाळ झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेची व आपल्या कार्यालयाची राहील.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या