Breaking News

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) मार्च 2024 परीक्षेबाबत.

 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) मार्च 2024 परीक्षेची आवेदनपत्रेन ऑनलाईन सादर करावयाच्या तारखांबाबत.



उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) मार्च 2024 परीक्षेस नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत,

तसेच पुनर्परीक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate). तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी विषय घेऊन प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे आहे.


💁 शुल्क प्रकार :-

माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate) श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणान्या विद्यार्थ्यांची, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of Credit घेणारे विद्यार्थी) यांचे आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने ऑनलाईन भरावयाच्या तारखा 


💁 नियमित शुल्कासह

शुक्रवार दिनांक 20/10/2023 ते

सोमवार दिनांक 20/11/2023


माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS/NEFT पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व माध्यमिक शाळा प्रमुख / मुख्याध्यापक यांनी नोंद घ्यावी.


सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिन (Login) मधून Pre-list उपलब्ध करुन दिलेली असेल, माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यानी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.


💁 इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्याच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे -

● शासननिर्णय क. गव्ह. १५१७/प्र.क.१९ / संगणक, दि. १४/०८/२०१७ नुसार माध्यमिक शाळांनी नियमित विद्याथ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्वीकारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे व सदर Saral Database वरुनच नियमित विद्याथ्र्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत.

● पुनर्परीक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate) श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणारे विद्यार्थी [ITI] (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of Credit घेणारे विद्यार्थी) यांची माहिती Saral Database मध्ये नसल्याने सदर विद्याथ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन भरावयाची आहेत.

● कौशल्य सेतू अभियानाचे Transfer Of Credit मागणाऱ्या विद्याथ्र्यांनी देखील ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरून विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पध्दतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी (Hard Copy) विभागीय मंडळात जमा करावी.

● ४. मार्च २०२४ मधील परीक्षेसाठी मार्च २०२३ अथवा जुलै-ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आवेदनपत्र भरून परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांस श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ठ होता येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या