Breaking News

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2023-24

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2023-24 चे आयोजन करणेबाबत..


राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2023-24 चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/ सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहायक, विषय साधनव्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य , केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी , अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता )

  सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकान्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. 

💁 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :-

■ पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांना प्रोत्साहन देणे.

■ शिक्षक व अधिका-यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे,

■ पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणा-या शिक्षक व अधिकारी यांना उत्तेजन देणे.

■ शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे.

■ शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे.

💁 नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे :-

नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.

● नवोपक्रमाचे शीर्षक उपक्रमाचे नेमके नाव लिहावे.

● नवोपक्रमाची गरज व महत्त्व उपक्रम निवडण्याचे कारण, गरज, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. तपशील

● नवोपक्रमाची उद्दिष्टे - हा उपक्रम भी का करतो आहे. उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा, कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.

● नवोपक्रमाचे नियोजन :-

◆ उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण   

◆ संबंधित व्यक्तीशी तज्ज्ञांशी चर्चा

◆ आवश्यक साधनांचा विचार

◆ करावयाच्या कृतींचा क्रम

◆ उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण

◆ कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)

◆ उपक्रमासाठी इतरांची मदत

◆ उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे

● नवोक्रमाची कार्यपद्धती :-

◆ पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

◆ कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन

◆ उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

◆ कार्यवाही करताना आलेल्या अडचणी

◆ माहितीचे विश्लेषण: आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)

● नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार) :-

   या उपक्रमातून काय साध्य झाले व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या घटकाला या उपक्रमाचा लाभ झाला, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती स्पष्ट करावी.

● समारोप :- आपल्या उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा झाला, हे स्पष्ट करावे.

● संदर्भसूची व परिशिष्टे - नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.

● नवोपक्रम अहवाल लेखनाबाबत मार्गदर्शनासाठी https://youtu.be/7_BjMmcciHc या लिंकवर जाऊन व्हिडीओ पाहावा. (लिंक वरील माहिती फक्त अहवाल लेखन मार्गदर्शनार्थं देण्यात आली आहे.)

💁 स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी :-

◆   स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये तसेच अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ. ६ वी ते ८वी ला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील.

◆ राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती/ सेविका व पर्यवेक्षिका वा स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.

◆ डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण) गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, जेष्ठ अधिव्याख्याता) या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.

◆ स्पर्धक सध्या SCERT/ प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) DIET मध्ये विषय सहाय्यक / DIET अंतर्गत विषय साधनव्यक्ती म्हणून कार्यरत असावा.

◆ सन २०२३ २४ पासून मराठी माध्यमासह इतर शिक्षक व अधिकारी यांचेसाठी देखील सदर स्पर्धा सुरु करण्यात येत आहे. इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये च सादर करावा.

💁 स्पर्धेचे नियम :-

1 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.

2 स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा, त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)

3 नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा. याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत खालील नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.

4 सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये

5 नवोपक्रम लेखन मराठी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.

6 नवोपक्रम टाईप केलेला असावा. टाईपिंग साठी Unicode या फॉन्टचाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू १.५ इंच व उजवी बाजू वरील बाजू, तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी १ इंच मार्जिन समास असावा.

7 हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

8 सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२२-२३ किंवा २०२३-२४ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा

9 नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ६ फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.

10 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये १०० शब्द मर्यादेत नवोपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे.

11 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने स्वतः चा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. नवोपक्रम फाईल PDF व MS WORD स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 MB पेक्षा जास्त नसावी.

12 स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंकवर विहित ठिकाणी नोंदवावी.

13 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ साठी स्पर्धकांनी आपले नवोपक्रम https://scertmaha.ac.in/innovation/ या लिंकवर दि. २८/११/२०२३ पर्यंत अपलोड करावेत.

14 जिल्हास्तर, विभाग स्तरावर प्रथम ७ व राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकाच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे सादरीकरण करणे बंधनकारक असेल.

15 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गुणानुक्रम पारितोषिके व उत्तेजनार्थं पारितोषिक पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधनकारक राहील.

💁 (टीप: मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाच ही मटाचे मूल्यमापन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या स्तरावर करण्यात येईल.)

💁 नवोपक्रम अहवालाचे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारावर करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल सर्वस्वी परीक्षकांवर अवलंबून राहील.

💁नवोपक्रम बॅंक :-

    राज्य स्तरावर पुरस्कार प्राप्त सर्वं नवोपक्रमांचा तसेच जिल्हा व विभाग स्तरावरील प्रत्येक गटातील गुणानुक्रमे पहिल्या पाच नवोपक्रमांचा समावेश राज्याच्या नवोपक्रम बैंक (Innovation Bank) मध्ये करण्यात येईल. हे नवोपक्रम SCERT, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या वेबसाईट वर Innovation Bank मध्ये प्रसिध्द करण्यात येतील. 


💁 महत्वाचे परिपत्रक 👇



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या