Breaking News

PM SHRI योजनेतंर्गत राष्ट्रीय स्तरीय प्रशिक्षणासाठी नामांकन करणेबाबत.

 PM SHRI योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या उच्च माध्यमिक शाळांमधील भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि गणित विषयातील शिक्षक आणि यांच्या समावेत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमधील अधिव्याख्यातांचे मास्टर ट्रेनर म्हणून राष्ट्रीय स्तरीय प्रशिक्षणासाठी नामांकन करणेबाबत.




      केंद्र शासन पुरस्कृत PM SHRI योजनेतंर्गत पहिल्या टप्यात निवड झालेल्या ५१६ शाळा उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने इतरांना मार्गदर्शक ठरेल अशा उदाहरण दाखल शाळा विकसित करावयाच्या आहेत. PM SHRI नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) मधील शिफारशीच्या अनुषंगाने PM SHRI शाळांमध्ये उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची आहे हे आपणास ज्ञात आहे.

     PM SHRI योजनेतंर्गत PM SHRI च्या उच्च माध्यमिक शाळांमधील भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि गणित विषयातील शिक्षकांनी समग्र, एकात्मिक आणि अनुभवजन्य दृष्टिने अध्यापन करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ जिज्ञासा आणि प्रेरणा निर्माण होणार नाही तर शिक्षकांना रचनात्मक वर्ग अध्ययन अध्यापन पद्धती अंगी करण्याची क्षमता विकसित होईल, त्याअनुषंगाने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांनी देशभरातील PM SHRI शाळेच्या उच्च माध्यमिक शाळांमधील भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि गणित विषयातील शिक्षक आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था मधील अधिव्याख्यातांसाठी

     संबंधित राज्यातील आय आय टी संस्थामध्ये ३ दिवसीय निवासी स्वरुपात मास्टर ट्रेनर म्हणून राष्ट्रीयस्तरावर प्रशिक्षण देण्याचे नियोजन करीत आहे. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील PM SHRI शाळांमधील उच्च माध्यमिक शाळांमधील भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि गणित या प्रत्येक विषयामधील शिक्षक आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था मधील अधिव्याख्यातांचे प्रशिक्षणासाठी सोबतच्या प्रपत्रातील विहीत नमुन्यात या लिंकवर https://forms.gle/9EbCeaxUEMpQAu6fA  नामांकन करण्यात यावे.

    सदर PM SHRI शाळांमधील उच्च माध्यमिक शाळांमधील भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि गणित या प्रत्येक विषयामधील शिक्षक आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था मधील अधिव्याख्याते है आय आय टी संस्थांमध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रीयस्तरीय प्रशिक्षणामध्ये सहभागी होतील. राष्ट्रीय प्रशिक्षण झाल्यानंतर मास्टर ट्रेनर म्हणून आपल्या जिल्ह्यातील इतर PM SHRI शाळांमधील शिक्षकांना संबंधित विषयामध्ये प्रशिक्षित करतील. त्या अनुषंगाने उपरोक्त बाबत योग्य अंमलबजावणी करावी.


💁  महत्वाचे परिपत्रक 👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या