Breaking News

इ.10 वी व इ.12 वी फॉर्म नंबर 17 बाबत ...

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

   


     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. १७ भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी माणून विद्याथ्यांचे नावनोंदणी अर्ज अतिविलंय शुल्काने मंगळवार दि. ०७/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्याच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या होत्या, सदर अतिविलंय शुल्काने अर्ज सादर करण्याच्या तारखांना खालीलप्रमाणे अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.

👉 अतिविलंब शुल्कासह अंतिम मुदत :-

◆ इ. १० वी व इ. १२वी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रति दिन रु २०/- स्वीकारुन नावनोंदणी अर्ज सादर करण्याच्या तारखा :- सोमवार दिनांक ११/१२/२०२३ ते बुधवार दिनांक २०/१२/२०२३

■ खाजगी विद्यार्थ्यांनी इ. १० वी व इ. १२वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

■ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी /इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

■ इ.१०वी -  http://form17.mh-ssc.ac.in

■ इ. १२वी - http://form17.mh-hsc.ac.in

■ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १) शाळा सोडण्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र २) आधारकार्ड ३) स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वतः जवळ ठेवावा, ऑनलाईन अर्ज भरतांना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत.

■ संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्याच्यनि अर्जात नमूद केलेलल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. विद्याव्यनि संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट, शुल्क पावती, हमीपत्र यासाह २ प्रतीत काढून घ्यावी.

■ विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याचाबत पोचपावतीच्या दोन लायाप्रती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत.

■ खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे :-

इ. १०वी - रु. १०००/- नोंदणी शुल्क रु १००/- प्रक्रिया शुल्क (Processing Fee) इ. १२वी - रु. ६००/- नोंदणी शुल्क रु १००/- प्रकिया शुल्क (Processing Fee) विलंब शुल्क अतिविलंब शुल्क विलंब शुल्क अतिविलंब शुल्क

■ (अ) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. यामध्ये विद्यार्थ्यांस त्याच्या पत्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यमनिहाय माध्यमिक शाळांची यादी दिसेल, त्यापैकी पूर्वीची शाळा किंवा पल्ल्यानुसार सर्वात जवळच्या शाळेची निवड विद्याब्वनि करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे. याबाबत सर्व माध्यमिक शाळांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. या वर्षापासून संपर्क केंद्र पध्दत बंद करण्यात आली असल्याने मान्यताप्राप्त सर्व शाळांनी खाजगी विद्यार्थी अर्ज स्विकारणे अनिवार्य आहे, याची सर्व मान्यताप्राप्त शाळांनी नोंद घ्यावी व उचित कार्यवाही करावी.

■ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करतांना विद्याच्यांस त्याच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या शाखा व माध्यमानुसार कनिष्ठ महाविद्यालयांची गादी दिसेल, त्यापैकी विद्यार्थ्यांनी पत्त्यानुसार सर्वात जवळच्या कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ग, प्रकल्प, प्रात्यक्षिक, तोडी, श्रेणी परीक्षा दयावयाची आहे. याचावत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे,

■ ९. इ. १०वी व इ. १२वी फेब्रु-मार्च २०२४ खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. १७ नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking बरे) भरणे अनिवार्य आहे ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्यांला पोचपावती प्राप्त होईल. सदर पोचपावती स्वत:कडे ठेवून त्याच्या दोन छायाप्रती माध्यमिक शाळेस/कनिष्ठ महाविद्यालयास देण्यात याच्यात तसेच एकदा नावनोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नावनोंरीपा विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नावनोंदणी अर्जात दुरुस्ती (उदा. माध्यम, शाखा, माध्यमिक महाविद्यालय अथवा अन्य कारणास्तव) करावयाची असल्यास विद्यार्थ्यांस पुनःश्च नावनोंदणी शुल्क जम याची नोंद घ्यावी.

■ दिव्यांग विद्याच्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ वायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ/माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी.

■ ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत गुरुजनी कमांक ०२०-२५७०५२०७/२५७०५२०८/२५७०५२७९ वर संपर्क साधावा.

■ विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र (Eligibility Certificate) अऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी.

■ पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (Examination Application Form) मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

■ खाजगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने नावनोंदणी करण्याकरिता अंतिम मुदत दिनांक २०/१२/२०२३ असणार आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, यानी संबंधितांनी नोंद घेवून उचित कार्यवाही करावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या