Breaking News

आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे - शिष्यवृत्ती परीक्षा

आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे



     विद्यार्थी मित्रांनो , आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे लिहितांना आपण इंग्रजी संख्या लेखन पद्धतीत लिहत असतो.त्याच प्रमाणे पूर्वी युरोप मध्ये संख्या लेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरांचा वापर केला जात होता.यासाठीच 1 म्हणजेच I , 5 म्हणजे V आणि 10 म्हणजेच X या प्रमाणे रोमन संख्याचीन्हे वापरली जात होती.अशा प्रकारच्या लेखन पद्धतीलाच रोमन लेखन पद्धत असे म्हणतात. आणि हो विद्यार्थी मित्रांनो यामध्ये शून्य या अंकासाठी कोणतेही संख्याचिन्हे वापरले जात नाही.तसेच या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नाही म्हणजेच अंकांची किंमत ही स्थानाप्रमाणे बदलत नाही.

रोमन संख्या लेखनासाठी महत्वाचे नियम पुढीलप्रमाणे :-

1 – जर सात रोमन अक्षरातील कोणतेही अक्षर डबल घेतले , तर त्यांची नेहमी बेरीज होते.

2 – सात रोमन अक्षरातील I , X , C आणि M ही अक्षरे जास्तीत जास्त फक्त तीन वेळाच Repet करू शकता.

3 - तसेच V , L आणि D ही अक्षरे पुन्हा डबल लिहली जात नाही म्हणजे हे फक्त एकदाच लिहले जाते 

4 - जेव्हा छोटे रोमन अक्षर हे मोठ्या अक्षराच्या डाव्या (LEFT) बाजूला लिहतात , तेव्हा त्या ठिकाणी वजाबाकी ही क्रिया करून मोठया संख्येतून लहान संख्या वजा करून संख्या मिळवली जाते.  

5 – जेव्हा छोटे रोमन अक्षर हे मोठया अक्षराच्या उजव्या (RIGHT) बाजूला असेल , तेव्हा त्या ठिकाणी मोठया संख्येत लहान संख्या ही मिळवली जाते.

6 – जेव्हा एखादया अक्षराच्या वर (  - ) असे चिन्ह असेल , तर त्याची किंमत ही 1000 पटीने वाढते. 

     खालील महत्वपूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा. 



वरील व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर खालील टेस्ट सोडवावी.


1/25
पूज्य आचार्य भिसे विदयालयात 'सव्वातीन हजार' विदयार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल ?
3250
३३२५०
२२५०
33350
2/25
XXXI - I = ?
XXIX
XXV
XXX
XX
3/25
सात अंकी सर्वांत मोठी सम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहितात ?
1000000
9999999
9999998
9999988
4/25
. 'अडीच लाख' ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहितात ?
२,५०,०००
2,75,000
2,25,000
२,२५,०००
5/25
७४९६२१ या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसा लिहाल ?
7
9
4
1
6/25
IX + IV = ?
XXV
XII
XIII
XIX
7/25
L, X, V, D, C, M या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा.
M, D, C, L, X, V
C, D, L, M, V, X
V, X, L, C, D, M
V, X, C, D, L, M
8/25
VII - VI = ?
III
II
I
IV
9/25
सभागृहातील एका ओळीत XXVII पासून LXVI पर्यंत आसनक्रमांक आहेत, तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत ?
40
48
39
38
10/25
रोमन संख्याचिन्हानुसार, XVII + IX - IV + L= ?
LCD
XXL
LXXII
LXI
11/25
रोमन संख्याचिन्हानुसार, M - C + L = ?
590
990
950
960
12/25
पुढीलपैकी 5 ची चार पट दाखवणारी संख्या कोणती?
02
25
10
20
13/25
72 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्याचिन्हे कोणती ?
LXXII
XXXLI
XXXXXI
XXXCI
14/25
400 ही संख्या रोमन संख्याचिन्ह लेखनपद्धतीत कशी लिहितात ?
CCCC
CD
CCD
DC
15/25
500 या संख्येला रोमन संख्याचिन्हांत कसे लिहिले जाते ?
M
D
C
L
16/25
पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती ?
15 - VVV
25 - XXV
4 - IV
6 - VI
17/25
XXXIX + VIII = किती ?
39
47
49
37
18/25
55 ही संख्या रोमन संख्याचिन्हांत कशी लिहितात ?
XXXXXV
VL
CV
LV
19/25
47 - 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्याचिन्हांत कसे लिहाल ?
XXXVIII
XXVII
LXIII
XXXVII
20/25
XIV + C - XXI + VII = ?
100
124
86
142
21/25
रोमन संख्याचिन्हे लिहा - 1000
L
C
D
M
22/25
आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे लिहा - XXX
20
25
30
300
23/25
10 + 50 + 5
IVX
LXV
LVX
LI
24/25
4 ही संख्या रोमन संख्या पध्दतीने कशी लिहावी ?
IV
VI
IX
XI
25/25
9 ही संख्या रोमन संख्या पध्दतीने कशी लिहावी ?
XX
IX
XI
IXX
Result:






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या