Breaking News

संकलित मूल्यमापन 2 आयोजनाबाबत महत्वपूर्ण सूचना

 STARS प्रकल्प नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन 2 :- इयत्ता 5 वी व 8 वी वार्षिक परीक्षा आयोजनाबाबत...


  सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यास अनुसरून 2023-24 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन 1 व संकलित मूल्यमापन - 2 अशा तीन नियतकालिक चाचण्या एकूण दहा माध्यमात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांची इयत्ता 3 री ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन 2 म्हणून सदर चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.संकलित मूल्यमापनचे आयोजन 02 ते 04 एप्रिल 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

📢 चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :-

◆ सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.

◆ चाचणीचे माध्यम व विषय: सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. (मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, बंगाली, सिंधी) इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांच्या चाचण्यांचे आयोजन करण्यात येईल.

◆ चाचणीचा अभ्यासक्रम: द्वितीय सत्रातील अध्ययन निष्पत्तींवर आधारित असेल.

◆ चाचणीचे स्वरुपः- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीमधील तरतूदीनुसार सदर चाचण्यांची इयत्तानिहाय गुणविभागणी असेल. त्यामध्ये लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असेल.

◆ चाचणी निर्मिती- सदर चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्यांची निर्मिती राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत करण्यात येईल.

◆ चाचणी कोणासाठी- संकलित मूल्यमापन -२ साठी छापील परीक्षा साहित्याचा पुरवठा (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांनाही करण्यात येईल

◆ चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी

गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात यावी.

◆ शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.

◆ शिक्षकांनी चाचणीचे धर्तीवर नमुना प्रश्न निर्मिती करुन विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा व मार्गदर्शन करावे 

◆ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारानुसार शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ / विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

◆ प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना सर्वसाधारण सूचना, इयत्तानिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचनासोबत उत्तरसूची आहे. त्यानुसार चाचणी तपासून गुण नोंद करावी.

◆ चाचणीचे गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात करावी.

◆ मूल्यमापन / चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.

◆ प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे संकलित मूल्यमापन २ चाचणी साहित्य शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना व खाजगी अनुदानित शाळांना छापील स्वरुपात पुरवठा करण्यात येणार असलेमुळे सदर विषयांसाठी वेगळ्या चाचणीचे आयोजन शाळांनी करु नये.

◆ तसेच संदर्भ क्र. ४ अन्वये शासन निर्णय राज्यमंडळाचा अभासक्रम राबविण-या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी लागू आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा तसेच इतर व्यवस्थापनाच्या शाळानी राज्यस्तरावरून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणा- या नमुना सराव प्रश्नपत्रिकांचा वापर करून समांतर प्रश्नपत्रिका तयार करून इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षा घ्याव्यात.

◆ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांनी इयत्ता ३ री ते ८ वी (प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा) या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी २ पुन्हा नव्याने घेवू नयेत. या चाचण्यांची गुणनोंद सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. तसेच इतर विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित मुल्यामापन २ चे मूल्यमापन करावे. इयत्ता ५ वी व ८ वी वगळता उपरोक्त इयत्ता ३ री ते ८ वीच्या वर्गासाठी चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावेत.

📢 प्राप्त गुणांची नोंद चॅटबॉटच्या माध्यमातून करणे :-

  चाचणी तपासून झाल्यानंतर शिक्षकांनी प्रश्ननिहाय प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रिकेवर करुन ठेवावी. सदर गुणांची ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध केलेल्या swift chat या app (चॅट-बॉट) वर तात्काळ करणेत यावी.

शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित व्यतिरिक्त अन्य शाळांना सदर चाचणी प्रश्नपत्रिका वापरायच्या असल्यास दिलेल्या वेळापत्रकानुसार चाचणी कालावधी पूर्ण झालेनंतर प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

📢  संकलित मूल्यमापन - 2 उद्देश :-

१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे.

२) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करणे,

३) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.

४) विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची सद्यस्थिती समजण्यास मदत होईल.


📢 संकलित मूल्यमापन - 2 चे वेळापत्रक :-

💁 प्रथम भाषा (सर्व माध्यम) - 02/04/2024

💁 गणित (सर्व माध्यम) - 03/04/2024

💁 तृतीय भाषा (सर्व माध्यम) - 04/04/2024



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या