Breaking News

दहा अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखन - शिष्यवृत्ती परीक्षा

दहा अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखन - शिष्यवृत्ती परीक्षा


     विद्यार्थी मित्रांनो , दहा अंकी संख्येचे वाचन किंवा लेखन करण्यासाठी प्रथमतः त्या प्रत्येक संख्येचे स्थान आपणास माहिती असायला हवे. स्थानांचे वाचन करून आपण दिलेली कोणतीही संख्या सहज वाचन करू शकतो. 

    कोणत्याही संख्येचे वाचन आपण दिलेल्या कोणत्याही संख्येच्या शेवटच्या स्थानापासून म्हणजेच एकक स्थानापासून त्याचे स्थान निश्चित करून करत असतो.जसे की , एकक , दशक , शतक , हजार , दशहजार , लक्ष , दशलक्ष , कोटी , दशकोटी , अब्ज याप्रमाणे स्थान आपण लक्षात ठेवले पाहिजे जेणेकरून दहा अंकी असलेल्या कोणत्याही संख्येचे वाचन आपण सहज करू शकू.

 7834529865 या दहा अंकी संख्येचे " सात अब्ज त्र्याऐंशी कोटी पंचेचाळीस लक्ष एकोणतीस हजार आठशे पासष्ट " असे वाचन करतात. म्हणजेच दहा अंकी संख्येचे वाचन करतांना दशकोटी व कोटी , दशलक्ष व लक्ष , दशहजार व हजार या स्थानांवरील अंक एकत्र वाचतात.तसेच दिलेल्या कोणत्याही संख्येचे संख्यावाचन सुलभ व अचूक व्हावे यासाठी त्या संख्येत स्वल्पविराम देऊन अंकाचे गट पाडले जातात जेणेकरून आपले वाचन हे सुलभ होते.

जसे की - 7,83,45,29,865 , 4,82,88,22,569

    विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही संख्येत स्वल्पविराम देतांना प्रथम उजवीकडून डावीकडे पहिले तीन अंक म्हणजेच शतक स्थानापर्यंतचे अंक सोडून स्वल्पविराम देतात आणि त्यानंतर दोन-दोनच्या गटानंतर स्वल्पविराम देतात.

10 एकक = 1 दशक

10 दशक = 1 शतक

10 शतक = 1 हजार

10 हजार = 1 दशहजार

10 दशहजार = 1 लक्ष / लाख

10 लक्ष = 1 दशलक्ष

10 दशलक्ष = 1 कोटी

10 कोटी = 1 दशकोटी

10 दशकोटी = 1 अब्ज




 पुढीलप्रमाणे टेस्ट सर्वांनी सोडवावी.

1/20
राजेशने बँकेत 66500 रु ठेव ठेवली. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही
सहासष्ट हजार पाचशे
साडेसहासष्ट हजार
सहाशे पासष्ट शतक
सहाशे पासष्ट दशक
2/20
6000912
सहा लक्ष शून्य नऊशे बारा
सहा कोटी नऊशे बारा
साठ लक्ष नऊशे बारा
सहा लक्ष नऊशे बारा
3/20
600606 ही संख्या अक्षरांत कशी लिहाल ?
सहा लक्ष सहाशे सहा
साठ लक्ष साठ हजार सहा
सहा लक्ष सहा हजार सहा
साठ हजार सहाशे सहा
4/20
880888
अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी
आठ लाख ऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी
अठ्ठ्याऐंशी लाख आठशे अठ्ठ्याऐंशी
आठ लाख ऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी
5/20
' चार अब्ज पन्नास हजार सहाशे दोन' ही संख्या अंकात लिहा.
4,05,00,602
04,50,602
4,00,00,50,602
40,00,50,602
6/20
99341 , .......... , 100005 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असतील , तर ....... येथे येणारी संख्या कोणती ?
99134
99300
99243
99443
7/20
एका संख्येच्या एकक स्थानी 6 हा अंक आहे. दशलक्ष स्थानी 5 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानांवर शून्य हा अंक असल्यास , ती संख्या अक्षरांत कशी लिहाल ?
पन्नास लक्ष सहा
पाच लक्ष सहा
सहा लक्ष पाच
पाच लक्ष सहाशे
8/20
सर्वात मोठ्या सात अंकी संख्येपेक्षा 2 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती ?
9999997
9999998
9999999
9999990
9/20
' पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव ' या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती ?
5,97,70,700
59,77,600
5,09,77,599
5,09,77,600
10/20
एका नऊ अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 8 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानांवर 0 हा अंक आहे.त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता ?
आठ अब्ज
आठ कोटी
ऐंशी कोटी
अठ्ठ्याऐंशी कोटी
11/20
' चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस' ही संख्या अंकात कशी लिहाल ?
4400440
4040440
40040440
4444400
12/20
' सत्तर लाख सात ' ही संख्या लिहितांना ईश्वरीने दोन्ही सातच्यामध्ये एक शून्य कमी लिहिले , तर तिने लिहलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे ?
63,00,000 ने जास्त
63,00,000 ने कमी
77,00,014 ने कमी
77,00,014 ने जास्त
13/20
पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे ?
4,16,606 - चार लक्ष सोळा हजार सहाशे सहा
5,15,000 - पाच लक्ष पंधराशे
9,99,000 - नऊ लक्ष नव्याण्णव हजार
3,03,303 - तीन लक्ष तीन हजार तीनशे तीन
14/20
50,00,00,001 ही संख्या अक्षरात लिहा ?
5 कोटी 1
50 कोटी
50 कोटी 1 दशक
50 कोटी 1
15/20
' पंधरा कोटी पंधराशे पंधरा ' ही संख्या अंकात लिहा ?
15,00,01,515
15,01,50,015
15,00,00,515
1,50,01,515
16/20
सर्वात मोठ्या दहा अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा.
नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव
नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नऊशे नव्याण्णव
नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव
नऊ कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव
17/20
5926714 या संख्येत लक्ष , हजार , व दशक या स्थानांवर अनुक्रमे कोणते अंक आहेत ?
5 , 6 , 1
6 , 5 , 1
5 , 1 , 6
9 , 6 , 1
18/20
एका संख्येत 6 दल , 0 लक्ष , 0 दह , 1 ह , 5 श , 3 द व 7 ए आहेत , तर ती संख्या कोणती ?
6001537
6001537
60001537
601537
19/20
' पन्नास लक्ष ' ही संख्या अंकात कशी लिहाल ?
50,000
50,00,000
5,00,000
55,00,000
20/20
9900000 ही संख्या अक्षरात लिहा
नऊ लाख नव्वद हजार
नव्याण्णव लाख
नव्याण्णव हजार
नऊशे नव्वद हजार
Result:


💁 सराव पेपर 1 - रोमन संख्याचिन्हे - येथे क्लीक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या